कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संचलित, महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या गांधी विचारधारा केंद्रीय ग्रंथालय या उपक्रमासाठी धुळे येथील प्राध्यापकांनी स्थापन केलेल्या रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्यावरील ७८ ग्रंथांची भेट देऊन ग्रंथदानाचा आदर्श घालून दिला.महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्रात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात हे ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. मनोहर पाटील होते तर केंद्राचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.शिवाजीराव पाटील, रिअल इंडो प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संभाजी पाटील, प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ, केंद्राचे सल्लागार समिती सदस्य पवनमहात्मा गांधी तत्वतात केंद्र, धुळे
रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाऊंडेशन धळे पोद्दार, नितीन ठाकूर, केंद्राचे संचालक डॉ संजय ढोडरे उपस्थित होते. हा उपक्रम कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असून, गांधी विचार, सामाजिक बांधिलकी, वाचनसंस्कृती आणि वैचारिक समृद्धी यांचे केंद्र म्हणून हे ग्रंथालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संभाजी पाटील व प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांच्याकडून मिळालेल्या ग्रंथभेटीचा स्वीकार कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील तसेच संचालक प्रा.डॉ. संजय ढोडरे यांनी केला. केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ भेट देण्यात आली



